नागपुरात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा; १ कोटीचे दागिने लंपास

crime
File Photo

नागपूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी सराफ व्यवसायिकाकडून १ किलो सोने, १५ किलो चांदी व रोख १ लाख २५ हजार असा एकूण १ कोटी १५ लाखांच्या मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर सराफा व्यवसायिकाची कार घेऊन ते पसार झाले. ही घटना बुधवारी (दि.२) रात्री पिपळा डाकबंगला येथे घडली.

 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिंपळा डाकबंगला सर्व्हिस रोड मार्गावर निहारिका ज्वेलर्स आहे. त्याचे मालक रवी मुसळे आणि त्यांचा पुतण्या मयंक मुसळे हे दोघे बुधवारी (दि.२) रात्री आठच्या सुमारास घराकडे जाण्यास निघाले. मयंकने सोन्याचांदीचे दागिने भरलेली बॅग कारमध्ये ठेवली. रवी व मयंक कारमध्ये बसत असताना दरोडेखोरांनी हवेत दोन गोळ्या फायर केल्या. त्यानंतर दोघांना मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून सोन्या- चांदीचे दागिने असलेली बँग हिसकावून घेतली. ती बँग व रोकड त्यांच्याच कारमध्ये ठेवून ती कार घेऊन ते पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता दरोडेखोर नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याचे दिसून आले. दरोडेखोरांना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व खापरखेडा पोलिसांची पथके तयार करण्यात आली. रात्री ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार हे खापरखेडा पोलिस ठाण्यात दाखल झाले. तपासादरम्यान सराफ व्यवसायिकाची कार ९ वाजता पाटणसावंगी शिवारात आढळून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here