५ लाखांची लाच स्वीकारतांना कराड नगरपालिका मुख्याधिकारी व कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात

कराड नगरपालिका

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : कराडमधील सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली आहे.

 

कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (वय ४०, रा. कार्वे नाका, कराड) यांच्यासह अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here