शेतात थाटला ड्रग्जचा कारखाना; पोलिस हवालदारच निघाला ड्रग्स माफिया

crime
file photo

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिना गावात एमडी ड्रग्स बनवणारी फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत ही कारवाई केली. विशेष म्हणजे या ड्रग्सतच्या धंद्यात पोलीस यंत्रणेतील कर्मचारी सहभागी असल्याची बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

डीआरआयच्या कारवाईत ११ किलो ६६ ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत, १७ कोटी रुपये आहे. ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस हवालदारासह सात जणांना पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणातील पाच आरोपींना चाकूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यातील १) प्रमोद केंद्रे २) महंमद शेख ३) जुबेर मापकर ४) आहाद मेमन ५) अहमद खान या आरोपींना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी असलेला पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. हा हवालदार चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवाशी आहे. त्याच्या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची निर्मिती करायचा. येथून तो, मुंबई ,पुणे यासह इतर शहरात ड्रग्स पुरवत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here