पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : देशी पिस्तूल आणि धारदार शस्त्राच्या सहाय्याने खूनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तर, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.४) रात्री ही घटना घडली होती. तिघांनी जुन्या भांडणाच्या रागातून हा हल्ला केल्याचे कबूल केले आहे.
प्रकाश ऊर्फ पक्या तुळशीराम पवार (वय २३, रा. हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल किरण ढोले (रा. गुलटेकडी) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे निरीक्षक विकास भारमळ, अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, विक्रम सावंत, शंकर संपते, सागर केकाण यांच्यासह पथकाने केली.







