बाणेरमध्ये साडे पाच लाखांचा गांजा जप्त

गांजा जप्त
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : नव्याने उच्चभ्रु परिसरात म्हणून नावारूपाला आलेल्या बाणेर परिसरात ‘ओझोकुश’ गांजा (हायड्रोफोनीक) पकडण्यात आला आहे. पोलिसांनी या छाप्यात तब्बल साडे पाच लाखांचा हा गांजा पकडला आहे.

याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार दाखल गुन्ह्यात अर्जुन लिंगराज टोटिगर (वय २६, रा. सुसगांव, बाणेर) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

 

शहरात ड्रग्ज मुक्त पुणे ही मोहिम देखील राबविली जात आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना तस्कारांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.तरी देखील काही तस्कर छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोन हे बाणेर परिसरात हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना ओझोकुश गांजाबाबत माहिती मिळाली. या माहितीनुसार, पथकाने शिवशक्ती चौकात छापा टाकून अर्जुन टोटिगर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५ लाख ५६ हजार रुपयांचा ओझोकुश गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने हा गांजा कोठून आणला. तसेच, तो कोणाला विक्री करणार होता, याबाबत तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here