पाकिस्तानी नंबरवरुन पुण्यातील उद्योजकाला धमकी

therat-on-phone

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : कोरेगाव पार्क येथील एका प्रसिद्ध उद्योजकाला ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, उद्योजकाला धमकाविण्यासाठी पाकिस्तानातील मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधला आहे.

 

या प्रकरणामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या असून, गुन्हे शाखा तसेच सायबर पोलिसांकडून देखील तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय उद्योजकाने कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे.

तक्रारीवरून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार कोरेगाव पार्क येथील बोट क्लब रस्त्यावर राहायला आहेत. त्यांची खासगी विमान कंपनी (एव्हिएशन) आहे. या कंपनीकडून हेलिकॉप्टर तसेच विमाने भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली जातात. भारतासह दुबई, इंग्लडमध्ये त्यांचा व्यवसाय आहे. २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइलवर सोशल मिडीयाद्वारे संपर्क साधला गेला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here