ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : उल्हासनगरात पाया सूपची गाडी लावण्यावरून वाद होऊन एका दिव्यांग शीख तरुणाला ५ ते ६ शीख तरुणांनीच मारहाण केल्याची घटना घडली. उल्हासनगरातील मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये राहणाऱ्या दिव्यांग तरुणाला मारहाण झाली आहे. कुलदीपसिंग लबाना असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मध्ये राहणारा कुलदीपसिंग लबाना हा खेमानी चौकात पाया सूपची गाडी लावतो. मात्र यावरून या परिसरात राहणारे गुरमित सिंग, अमर सिंग, छब्बू सिंग, बलबीर सिंग आणि निहाल सिंग हे शीख तरुण त्याच्याशी वाद घालत होते. ‘तू आमच्या एरियात गाडी का लावतो? यावरून या तरुणांनी त्याला ११ वर्षांपूर्वीही मारहाण केली होती.
कुलदीप हा शुक्रवारी मुलींना सोडायला शाळेत जात असताना त्याला रस्त्यात गाठून या तरुणांनी त्याला पुन्हा एकदा कानशिलात लगावत गाडी लावण्यास मज्जाव केला. मात्र तरीही दुसऱ्या आठवड्यातील बुधवारी रात्री कुलदीपने खेमाणी चौकात पाया सूपची गाडी लावल्यामुळे गुरमित सिंग, अमर सिंग, छब्बू सिंग, बलबीर सिंग, निहाल सिंग या सर्वांनी कुलदीप याला घरात घुसून मारहाण केली.







