डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार

thane-police

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : डोंबिवलीत एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही गतीमंद महिला आपल्या नातेवाइकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी काही तासांत आरोपी फैजल खानला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

डोंबिवली शहरात एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केला आहे. पीडित महिला सोनारपाडा येथील नातेवाइकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने महिला गतिमंद असल्याचा फायदा घेत तिला मुंब्रा येथील अज्ञात ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.

याप्रकरणाची माहिती पीडित कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. फैजल खान असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून, टिळक नगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ कारवाई करत अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here