आयपीएस अंजना कृष्णा यांची अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

वाळू उत्खनन

पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कौठाळी येथे गोडसे वस्तीत भिमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करुन त्याची वाहतूक व साठा करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर परिविक्षाधीन आयपीएस अंजना कृष्णा यांनी तात्काळ कारवाई करत ३९ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोपनीय माहिती मिळताच आयपीएस अंजना कृष्णा यांनी वेगवेगळी पथके तयार करुन एकाच वेळी छापा टाकून भिमा नदीचे पात्रात सुहास उर्फ तात्या शिवाजी गोडसे, बालाजी लक्ष्मण पवार, संजय पवार व अन्य इसम यांचेविरुध्द कारवाई केली. यात २ ट्रॅक्टर ट्रॉलीसह एक जेसीबी व २ ब्रास वाळूचा साठा असा ३४ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
त्याचवेळी मिळालेल्या बातमीवरून मौजे शिरढोण गावाच्या हद्दीत भिमा नदी पात्रातून सुरु असलेल्या वाळू वाहतूकीच्या ठिकाणी छापा मारुन दिपक तुकाराम अधटराव हा अशोक लेलॅण्ड दास्त या गाडीत वाळू घेऊन येतांना आढळला. संशय आल्याने त्याला हटकले असता तो वाहन सोडून पोडून गेला. या प्रकरणी अशोक लेलॅण्ड कंपनीची गाडी व एक ब्रास वाळू असा ५ लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही ठिकाणी मिळून ३९ लाख ८ हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे परिविक्षाधीन आयपीएस अंजना कृष्णा, पोउनि अनिल पाटील, विरसेन पाटील, ज्योती बैनवाड, पोसई फुगारे, पोहकाँ पठाण, पोना इरफान मुलाणी, पोकाँ अयाज काझी, मेहेत्रे, गणेश पाटील, अजित मिसाळ, पोना कवले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here