पीएसआय रविंद्र डोईफोडे यांच्या सतर्कतेने वाचले मुलीचे प्राण

पीएसआय रविंद्र डोईफोडे

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : माण तालुक्यातील पळशी येथील बंधाऱ्यात आपल जीवन संपवण्याच्या उद्देशाने एका तरुणीने उडी मारली घरातील किरकोळ वादाचा राग धरून तिने आपलं जीवन संपवण्याचा इरादा करून मारुती मंदिराच्या पाठीमागील बंधाऱ्यात उडी मारली मुलीने बंधाऱ्यात उडी मारल्यानंतर आईने आरडाओरडा केला.

 

त्याचवेळी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनला कार्यारत असलेले व पळशीचे सुपुत्र असलेले पीएसआय रविंद्र डोईफोडे हे आपल्या गावी आले असता, त्या ठिकाणावरून गाडीवर चालले होते मुलीच्या आईचा आरडाओरडा ऐकून त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली पोहणारे कुणीही जवळ नसल्यानं पीएसआय डोईफोडे यांनी मागचा पुढचा न विचार करता थेट बंधाऱ्यात उडी घेतली आणि त्या मुलीला बुडण्याच्या आत बाहेर काढले.
या घटनेत मुलीचा जीव वाचला पीएसआय डोईफोडे हे गावी असताना देखील आपल्या वर्दीच्या सेवेत होते या सर्व गोष्टींची माहिती बाहेर कळताच पीएसआय रविंद्र डोईफोडे वर्दीतील देवमाणूस असल्याची चर्चा रंगली सोशल मीडिया आणि गावागावात डोईफोडे यांच्या कामगिरीचे किस्से पोहोचले डोईफोडे यांनी दाखवलेल्या कर्तव्यतत्परतेबद्दल त्यांचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here