अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे महात्मा फुले जयंती साजरी

महात्मा फुले जयंती

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर चे संचालक तथा निवृत्त शिक्षक व्ही.बी.सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी, प्राचार्य मनेष माळी हे होते.

 

प्रथमतः महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उमेश माळी,विजय ठाकरे यांनी विचार मांडले.अध्यक्षिय भाषणातून शिक्षणाबद्दल सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्व त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा राजेंद्र सोनवणे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक झेड.एम.गवळी,जे.पी.सोनवणे, गणेश भावसार, राकेश पगारे, गणेश पगारे, गणेश नेरकर, संदिप पवार,प्रमोद जगताप, चतुर्थ कर्मचारी विलास पगारे आदी प्रयत्नशील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here