शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी क्रांती युवक मंडळ शिर्डी चे नव नियुक्त अध्यक्ष श्री आकाश त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली व उत्सव नियोजन अध्यक्ष सागर बेलदार यांच्या नियोजनात नव्याने तरुणांमध्ये व्यायाम करण्याची आवड निर्माण व्हावी, स्वतःच्या आरोग्य विषयी जागरूकता यावी या दृष्टीने जोर बैठका स्पर्धा व सव्वाशे किलोचा दगडी गोटा उचलने अशा स्पर्धाचे आयोजन केले होते.
तरुण निर्व्यसनी राहावेत, चांगल्या विचारांमध्ये रहावे यासाठी क्रांती युवक मंडळ अनेक वर्षां पासून गिर्यारोहन, दही हंडी, रंग पंचमी, गणेश उत्सव, ढोल पथक, कोजागिरी अशा उपक्रमांचे आयोजन करत आले आहे. नुकताच मंडळाचे अध्यक्ष श्री आकाश त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील द्वारकामाई मंदिरा समोर रंग पंचमीच्या रंगोत्सवाचा आनंद मंडळाच्या कार्यकर्त्यांसह हजारो साई भक्तांनी लुटला होता तसेच आज होणार्या हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांत व स्पर्धामध्ये हनुमान भक्तांनी मोठया संख्येने आपला सहभाग नोदवला मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी जोर बैठका स्पर्धाचे बक्षीस ही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते.
प्रथम पारितोषिक ७००१- शुभम पाचोरे द्वितीय ५००१- शिवम पाचोरे तृतीय ३००१- विक्रम चौधरी व सन्मान पत्र देण्यात आले तसेच इथून पुढे ही अशाच पद्धतीचे व याही पेक्षा चांगले कार्यक्रम मंडळाचे कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक विराटजी पुरोहित यांनी केले माजी अध्यक्ष व विश्वस्त सचिन तांबे विशाल कोळपकर विठ्ठलराव जाधव सुरेंद्र महाले महेश वैद्य अतीक पठाण यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले यावेळी मंडळाचे शुभम नाणेकर, सागर परदेशी, हर्षल अभंग, प्रितम कसबे, ललित शेळके, संदेश रत्नपारखी, सचिन हाराळे, जतीन जैन, आकाश वाडेकर, शिवम अगरवाल, सचिन वाणी राजू पांचाळ तेजस दोडीया, आदित्य वारुळे, किशोर कोते, आर्यन तेजी, प्रणव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







