डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकामुळे नांदूरखी च्या वैभवात भर पडणार : ज्ञानदेव चौधरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : राहाता तालुक्यातील नांदूरखी बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा युवा प्रतिष्टान व सर्व नांदूरखी ग्रामस्थ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथमतः महामानवाला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली बौद्धचार्य विजय खंडिझोड यांनी पंचशीलाचे वाचन केले अर्धाकृती असलेल्या पुतुल्याच्या ठिकाणी आता नवीन पूर्णाकृती आकर्षक पुतूळा बसविण्यात येणार असल्यामुळे या परिसराच्या वैभवात अधिकच भर पडणार असल्याचे प्रतिपादन राहाता बाजार समिती चे संचालक ज्ञानदेव चौधरी यांनी भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन केले यावेळी नांदूरखी चे सरपंच माधव चौधरी माजी सरपंच योगेश चौधरी उप सरपंच सचिन कोळ गे माजी सरपंच राजेंद्र चौधरी माजी उपसरपंच विरेश चौधरी किरण चौधरी बापूसाहेब दाभाडे सागर पाडेकर सुधाकर बिडवे विलास वाकचौरे आपासाहेब दाभाडे संजय वाकचौरे रामनाथ वाकचौरे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर हजर होते स्मारक समितीचे सर्व सदस्य सर्व कोळगे परीवार ही या ठिकाणी हजर होते.

विखे पिता पुत्रांचा अभिनंदनाचा ठराव केला मंजूर
अहिल्यानगर चे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून आकर्षक असा पूर्णाकृती पुतूळा भेट नांदूरखी करा ना मिळणार असल्याने पिता पुत्राचा अभिनंदनाचा ठराव नांदूरखी गावच्या वतीने पत्रकार रामभाऊ पिंगळे यांनी यावेळी मांडला तर त्याला सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात माजी सर पंच योगेश चौधरी यांनी अनुमोदन दिले.

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून तर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून या ठिकाणी लवकरच डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतुळा बसविण्यात येणार आहे या जयंती सोहळ्या निमित्त गावातील सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व स्मारक समितीचे सर्व सदस्य युवा प्रतिष्टान चे सर्व सदस्य हजर होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ज्ञानदेव चौधरी राजेंद्र चौधरी माधवराव चौधरी अर्जुन कोळगे पत्रकार रामभाऊ पिंगळे योगेश चौधरी सुधाकर बिडवे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिलीप कोळगे यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here