उशीरा लागवड झालेला रब्बी कांदा करपा रोगाने १००% करपला; चार एकरसाठी केलेला खर्च गेला वाया!

रब्बी कांदा
विठेवाडी ता देवळा येथील शेतकरी कैलास पुंजाराम जाधव या शेतकऱ्यांचा चार एकर रब्बी कांदा करपा रोगाला बळी पडून जळुन खाक झाला आहे.

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : मागील वर्षी आक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांदा खराब झाला होता, चालु वर्षी रब्बी कांद्याची विक्रमी लागवड झाली असली तरी दिड दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पाऊस व गारपिटीने उभ्या असलेल्या कांदा पिकांवर विपरीत परिणाम झाला होता.

१५ जानेवारी नंतर लागवड केलेल्या उन्हाळी कांदा पिक अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे संपूर्णतः खराब झाला आहे, कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत हजारो रुपये खर्च झालेला आहे, अवकाळी पाऊस आणि वाढलेल्या तापमानाचा जबरदस्त फटका रब्बी कांद्याच्या पिकाला बसला आहे, कसमादे मधील विशेषतः देवळा, मालेगाव, बागलाण, कळवण तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात करपा रोगाने थैमान घातले आहे, त्यामुळे उशिरा म्हणजे १५ एप्रिल नंतर काडनिला आलेल्या कांद्याची साइज एकदम कमी झाली आहे, काही ठिकाणी तर करप्याने संपूर्ण कांद्याचे पिकच जळुन खाक झाले आहे,विठेवाडी,झिरेपिंपळ,भउर,सटवाइवाडी, तसेच देवळा तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील हंगामात कांद्याची लागवड मर्यादित होती,त्याच बरोबर लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती तरी अवकाळी पावसामुळे तो खराब झाला होता, निर्यात बंदीचा फटका उत्तपादक शेतकऱ्यांना बसला होता, चालु हंगामात लागवड क्षेत्र जारी वाढले असले तरी अवकाळी पाऊस व वाढलेल्या तापमानामुळे अखेरच्या टप्प्यात एकरी उत्पादनात मोठी घट होत आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही कांदा विक्रीची घाई न करता टप्प्याटप्प्याने अर्थात तिन टप्प्यात कांदा विक्रीचे नियोजन करावे
– कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना

एका एकर कांदा लागवडीसाठी अंदाजे खर्च ८० हजार पेक्षा अधिक येतो, शेतकऱ्यांनी या वर्षी कांद्यासाठी स्प्रिंकलर व ढिंबक सिस्टीमचा वापर केलेला आहे, साडेपाच ते सहा लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी कांद्याची लागवड झालेली होती परंतु करपा रोगामुळे एकुण उत्पादनात फारसी वाढ होणार नाही उशिरा काढणिला आलेल्या कांद्याचे उत्पादन ५० % कमी होण्याचा कयास आहे,क्रुषि आणि महसूल विभागाचे करपा बांधिल क्षेत्राची पाहणी करून पंचणामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here