माळशिरसमध्ये विविध विकास कामाचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत वेळापूर नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नातेपुते शहरासाठी पुणे पंढरपूर रोडवर आधुनिक ट्रीट लाईट बसवण्यात आले आहे.

या कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार राम सातपुते मुख्याधिकारी डॉक्टर कल्याण हुलगे नगराध्यक्ष अनिता लांडगे तसेच नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी रस्ते सभामंडप गटारी मंदिरीचे यासाठी सुमारे 27 कोटी रुपये चा निधी दिलेला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर नगर विकास खात्याच्या योजनेमधून आधुनिक ट्रीट लाईट दोन कोटी 65 लाख रुपये ची विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर करून आणली असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.
मैत्री मळा वेळापूर पिसेवाडी चार किलोमीटर व अन्य सात रस्त्याच्या कामाची भूमिपूजन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संबंधित ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच वेळापूर येथील अर्धनारी नाटेश्वरी मंदिर येथे भेट देऊन पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here