साक्री तालुका माध्यमिक शिक्षकांच्या चेअरमनपदी सुनील क्षीरसागर तर व्हॉइस चेअरमनपदी कुणाल गांगुर्डे बिनविरोध

साक्री तालुका माध्यमिक

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका माध्यमिक शिक्षकांची पतपेढी साक्रीच्या २०२३ ते २०२७ कार्यकाळातील तिस-या वर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा काल साक्रीत संपन्न झाली.

 

या बोलाविलेल्या विशेष वार्षिक सभेत माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन या दोन्ही पदांसाठी लोकशाही पद्धतीने बिनविरोध निवड करण्यात आली. पतपेढीच्या चेअरमनपदी घोडदे येथील मुख्याध्यापक सुनील आनंदराव क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली. तर व्हा. चेअरमन पदी पिंपळनेर कन्या शाळेचे जेष्ठ शिक्षक कुणाल गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी पिंपळनेर येथील कर्मवीर आ मा पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र मराठे व सेवानिवृत्त प्राचार्य ए.बी. मराठे व त्यांचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.निवडूक प्रकियेत सहाय्यक निबंधक आर.सी. चौधरी यांनी काम केले. तर डी. वी. सूर्यवंशी यांनी अनुमोदन केले आणि अनिल दयाराम शिंदे हे सूचक होते.एक एकच नामांकन पत्र दाखल असल्याने निवड बिनविरोध झाली.

चेअरमन म्हणून सुनील क्षीरसागर व व्हा. चेअरमन पदी कुणाल गांगुर्डे यांचे बिनविरोध निवड होतात पतपेढीत संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष सभेत माध्यमिक शिक्षकांचे पतपेढीचे मावळते चेअरमन डी व्ही सूर्यवंशी, अनिल भदाणे, सर्व सभासद बंधू व मावळते संचालक मंडळ तसेच माध्यमिक शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडीबद्दल सुरेंद्रराव मराठे, जगदीश वाघ, माजी प्रभारी सरपंच सुभाष नहिरे, बंडू गवळी, गोविंद पाटील सोनवणे, विजयराव सोनवणे, कमलाकर क्षीरसागर ,राजेंद्र गवळी, धर्मा घरटे, कैलास पाटील क्षीरसागर, घोडदे येथील सर्व माध्यमिक शिक्षक ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here