अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या खासगी बस चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने, पुन्हा एकदा राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. या याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बसचालक दादा उर्फ विकी भोसले आणि त्याला मदत करणारा योगेश माळी, अशी आरोपींची नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील राहणारे आहेत.
आरोपींकडून अल्पवयीन मुलीला शाळेतून घरी सोडताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबोणीच्या बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करत फोटो काढले. तेच फोटो आई-वडील यांना दाखवून जिवे मारण्याची धमकी देत पुन्हा आरोपीच्या राहत्या घरी नेऊन बलात्कार केला. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्या पिडीत मुलीला पालकांनी चौकशी असता तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.