बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात एका महिला वकिलाने डीजेच्या आवाजाबद्दल तक्रार केली. या महिलेला गावातील सरपंच आणि कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.काठ्या, रॉड आणि पाईपने केलेल्या या क्रूर हल्ल्यात महिला वकिला गंभीर जखमी झाली.या हल्यात महिला बेशुद्ध झाली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.या घटनेनंतर बऱ्याच राजकीय नेत्यांनी सरकारला याचा जाब विचारला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटरवर लिहिले की, दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्या पुढे गेला आहे. १० पुरूषांनी एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी लिहिले की, काठ्या आणि लोखंडी पाईपने हल्ला झाल्यानंतर ती महिला बेशुद्ध पडली आणि फक्त एका रात्रीनंतर तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारचे अपयश दर्शवते. जर वकील असलेल्या महिलेला कोणतेही संरक्षण मिळाले नाही, तर सामान्य महिलांचे काय होईल? आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.