बस स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी जेरबंद

टोळी जेरबंद

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी चोपडा बस स्थानक परिसरात आल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांनी कारवाई करून चार जणांना अटक केली. या चोरांच्या टोळीमध्ये जालना पोलीस दलातील ग्रेड उपनिरीक्षकाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बस स्थानक परिसरामध्ये चोरटे येणार आहेत. त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा लावून ठेवला होता. संशयित आरोपी एम एच 43 29 28 क्रमांक चार वाहनातून पळून जात असताना त्यांना अटक करण्यात आली.

या चोरीच्या टोळीमध्ये प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक, जालना ,)श्रीकांत भिमराव बघे वय २७, रा. गोपालनगर, खामगाव) , अंबादास सुखदेव साळगावकर वय ४३, रा. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) , रउफ अहमद शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांचा समावेश आहे.

या अटक करण्यात आलेल्या चोरांच्या टोळीमध्ये प्रल्हाद मालटे हे जालना पोलीस दलातील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक असून, ते तीन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते. ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील आणि पोना हेमंत पाटील यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here