पोलिस कर्मचारी अनिल कुकडे पाच हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

bribe-to-police
File Photo

बुलढाणा (प्रतिनिधी) : कथित फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचारी अनिल कुकडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 16 एप्रिल रोजी रात्री करण्यात आली आहे.

शहरातील कारंजा चौकात एका चहाच्या टपरीवर पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी अनिल कुकडे याला रंगेहात पकडण्यात आले. प्रारंभी या प्रकरणात 20 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

त्यानंतर 15 हजार रुपयांवर तडजोड झाली आणि त्यातील 5 हजार रुपये स्वीकारताना कुकडे जाळ्यात अडकला. नवीन ठाणेदार पदभार स्वीकारत असतानाच पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here