कीव (वृत्तसंस्था) : युक्रेनमधील रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एका धक्कादायक घटनेने भारतात चिंता निर्माण केली आहे. कीव शहरात असलेल्या कुसुम हेल्थकेअर या भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे व्हायरल होत आहेत. काहींनी हा हल्ला रशियाकडून जाणूनबुजून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी याला युक्रेनच्या क्षेपणास्त्र चुकवण्याची चूक म्हटले आहे. या प्रकरणावर आता रशियन दूतावासाने अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, भारतीय कंपनीवर रशियाने हल्ला केल्याचे दावे स्पष्टपणे फेटाळले आहेत.
नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, रशियन सशस्त्र दलांनी १२ एप्रिल २०२५ रोजी कीवच्या पूर्वेकडील कुसुम हेल्थकेअरच्या फार्मसी गोदामावर कोणताही हल्ला केला नव्हता, ना त्यांनी अशी कोणतीही योजना आखली होती.