सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : कातरखटाव तालुका खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ८ खोल्यांच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कातरखटाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. ना.गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेस नवीन ८ खोल्या बांधण्यासाठी १ कोटी २२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्या पिढीला उत्कृष्ट शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही वास्तू मार्गदर्शक ठरेल.या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी भाजपा कार्यकारणी सदस्य,श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ.सोनिया गोरे, मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर साहेब , खटाव तालुका भाजपाअध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब , भाजपा विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले ,श्री. एस. डी. खाडे साहेब शाखा अभियंता, श्री. पी. एम. कुलकर्णी साहेब शाखा अभियंता, श्री. सुहास माने साहेब कनिष्ठ अभियंता. युवानेते विशाल बागल, विजय बागल, सुशील तरटे, दत्ता बोडके, भगतसिंग पाटील, सुमित तरटे,यांच्यासह ग्रामस्थ मान्यवर, सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







