थंड पाणी देण्याच्या बहाण्याने बोलावून ५५ वर्षीय व्यक्तीचा ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

rape
file photo

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : बोरिवलीत एका ५५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणानंतर चिमुकली प्रचंड घाबरली होती. नंतर तिच्या पालकांनी पीडित चिमुकलीला प्रेमाने विचारले. तेव्हा तिने सगळी आपबिती सांगितली. यानंतर संतप्त पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच नरधमाविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राम ललित यादव असे आहे. रविवारी थंड पाणी देण्याच्या बहाण्याने मुलीला त्याच्या झोपडीत बोलावून घेतलं. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर ‘कुणाला सांगितल्यास ठार मारेन’ अशी चिमुकलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यामुळे चिमुकली प्रचंड घाबरली. मुलगी घाबरतच आपल्या घरी निघून गेली. पालकांनी तिला प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा पीडित चिमुकलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली.
त्यानंतर पीडितेच्या पालकांनी चिमुकलीला एमएचबी पोलीस ठाण्यात नेले. यासह मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच पोलिसांकडे नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला अटक केली. ताब्यात घेतल्यानंतर नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here