कळवा पोलिसांची मोठी कारवाई – मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

कळवा पोलिसांची

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : ठाणे व मुंबई परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर कळवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या टोळीने ठाणे परिसरात विविध भागातून दुचाकी चोरी करत नागरिकांना आर्थिक फटका दिला होता. या गुन्ह्यांतील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे २.५ लाख रुपये किंमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

 

ही उल्लेखनीय कामगिरी कळवा पोलिसांनी फक्त १० दिवसांत केली असून, ठाणे पोलिस दलातील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कार्यक्षमतेचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ९ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत अशरफ इसराईल खान (रा. कळवा नाका) यांच्या यामाहा आर १५ (MH-04-LR-6117) ही १.३० लाख रुपये किमतीची मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून चोरीस गेली. त्यांनी कळवा पोलिसात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याची नोंद कळवा पो.स्टे. गु.र.नं ३१०/२०२५ भा.न्या. सं ३०३(२) अंतर्गत करण्यात आली. मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे, सहा. पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी विशेष पथक तयार करून तपासाला वेग दिला. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सपोनि संतोष पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी बारकाईने पाहणी केली. आरोपींच्या हालचाली टिपण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटली.

दि. १८ एप्रिल २०२५ रोजी, पथकाने कुशलपणे सापळा रचून दोघा आरोपींना अटक केली. आरोपी १ – अरबाज मोहम्मद जावेद खान (२२), रा. रशिद कंपाउंड, कौसा, मुंब्रा, आरोपी २ – आसिफअली सौरभअली शेख (२२), रा. शिळगाव, मुंब्रा दोघांनाही अटक करून पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्यांनी खालील चोरी केलेल्या मोटारसायकलची कबुली दिलीः यामाहा R15 (MH-04-LR-6117) – ₹1,30,000, TVS ज्युपिटर (MH-04-KE-7687) – ₹60,000, होंडा ॲक्टिव्हा (MH-03-BU-5464) – ₹60,000. सदर गुन्हे उघडकीस आणण्यात सहभागी अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईमागे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोनि (प्रशासन) विठ्ठल नावडे, पोनि (गुन्हे) अनिल गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकातील हे अधिकारी व अंमलदार यांनी अतुलनीय मेहनत घेतली. सपोनि संतोष पिंपळे, पोहवा उदय कोरे, निखिल जाधव, राहुल पवार, दादापाटील घुगे, गणेश बांडे, पोना चंद्रभान शिंदे, पोना माळी, गोशि नामदेव कोळी, पोशि प्रशांत लवटे यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे.
सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून,ते ठाणेच्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोना चंद्रभान शिंदे करीत आहेत. ही कारवाई ठाणे पोलिसांची दक्षता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठीची वचनबद्धता अधोरेखित करणारी ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here