पंढरपूर (तालुका रिपोर्टर प्रकाश इंगोले) : बुधवार दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित. श्रीनाथ विद्यालय सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. या विद्यालयातील विज्ञान विषयाचे शिक्षक जब्बार शिकलगार सर यांचे सेवापूर्ती सन्मान सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात थाटामाटात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री. आर. बी. जाधव साहेब, संस्था सचिव श्री अंकुश अण्णा इंगोले साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रमोद बाबर सर, माजी मुख्याध्यापक श्री मुलाणी सर, केंद्र प्रमुख श्री अनिल बनगर साहेब, माजी केंद्रप्रमुख श्री.खुळे साहेब, आरपीआय तालुका पंढरपूर अध्यक्ष नितीन गायकवाड, विद्यालयाची मुख्यध्यापक श्री महेश इंगोले सर, श्री संजय हेगडे गुरुजी, श्री चंदनशिवे गुरुजी, श्री भारत कोळेकर आदी ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक स्टाप व विद्यार्थी उपस्थित होते.







