अहिल्यानगर (जिल्हा क्राईम रिपोर्टर अण्णासाहेब बनसोडे) : येथे आठवीच्या विद्यार्थ्याला रिंगण करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या वसतीगृहामध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेतील नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने आठवीच्या मुलाला मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड येथील एका निवासी शाळेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील नववीमध्ये शिकणाऱ्या मुलांनी आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला आहे. जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती आहे.







