कोल्हापूरमध्ये तरुणाला विवस्त्र करुन बेदम मारहाण

crime
File Photo

कोल्हापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर जावेद देवडी) : मुरगुड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चौघांनी केलेल्या जबर मारहाणीत सौरभ कांबळे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

जखमीवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सौरभला या नराधमांनी विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केलीय. मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील मारेकर्‍यांनी काढला आहे. तसेच मारेकऱ्यांनी मारहाण करताना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली.
दरम्यान, या मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here