सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात आज गुरुवारी कुख्यात गुंड नितीन पालकर याची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
इस्लामपूरमधील गुन्हेगारी जगतात दबदबा असलेल्या नितीन पालकर याचा आज गुरुवारी दुपारी खून झाला. वाळवा बाजारसमोर एका पान टपरीजवळ तो थांबला असताना, दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. पालकरवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता इस्लामपूर पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही केली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या त्याच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







