विजापूर (छत्तीसगड) : जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. करेगुट्टा जंगलात २० हजार कोब्रा कमांडोंनी १ हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे. जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. आतापर्यंत ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा रखील दल, बस्तर फायटर्स, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांच्याद्वारे करण्यात येत आहे.
या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना प्राप्त झाली होती. त्यानंतर २० हजार जवानांनी या करेगुट्टा जंगलाला वेढा घातला. या जंगलात तब्बल १००० नक्षलवादी असल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दल ड्रोनच्या माध्यमातून ही कारवाई करत आहे.
आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. 20 हजार जवानांनी १ हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे. बीजापुर जिल्ह्यात देखील नक्षलवाद्यांशी चकमक सुरू आहे. उसुरपोळीस ठाण्याच्या क्षेत्रात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपले असल्याचे समजते आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.







