सातारा (उपसंपादक लव चव्हाण) : खटाव तालुक्यातील १३३ ग्रामपचंयती सन २०२५ ते ३० या वर्षांसाठी आरक्षणाची प्रवर्ग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात . यावेळी प्रातांधिकारी उज्वला गाडेकर , तहसिलदार बाई माने , अप्पर तहसिलदार अनिकेत पाटील , गटविकास अधिकारी जस्मीन शेख आदिची प्रमुख उपस्थिती होती .
येथील पंचायत समिती बचत सभागृहात अनुसूचित जाती , नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली . यामध्ये अनुसूचित जाती साठी १२ सरपंच , नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ३५ सरपंच पद व सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८६ सरपंच पद सोडत जाहीर करण्यात आली .
यामध्ये सर्वसाधारण महिला सरपंच साठी ४३ गावे पुढील प्रमाणे – पाचवड , रहाटणी , गुरसाळे , पुसेसावळी , येरळवाडी , वांझोळी , कळंबी , ललगूण , कटगूण , पडळ , पुसेगाव , पेडगाव , जाखनगाव , पांढरवाडी , गारळेवाडी , नढवळ , मरडवाक , नांदोशी , धकटवाडी , पवारवाडी , डांभेवाडी , पारगाव , चिंचणी , मोळ , गारुडी , गिरीजाशंकर वाडी , डाळमोडी , मुसांडवाडी, वाकेश्वर , मांजरवाडी, गुंडेवाडी , खबालवाडी , वेटणे , रेवलकरवाडी , जांब, नागनाथवाडी , गोसाव्याचीवाडी , गादेवाडी, धोंडेवाडी , काळेवाडी , भोसरे , खातगुण , ढोकळवाडी .
सर्वसाधारण सरपंच पुढील प्रमाणे – खटाव , कामथी तर्फ परळी , गोरेगाव वांगी , पळशी , पिंपरी , मायणी , दातेवाडी , यलमरवाडी , उंबर्डे , नायकाचीवाडी , बोंबाळे , माने – तुपेवाडी , भुरकवडी , उंबरमळे , हिवरवाडी , फडतरवाडी ( बुध ) , नवलेवाडी , पांगरखेल , वाकळवाडी , दरुज , शिरसवडी , औंध , फडतरवाडी ( नेर), अनपटवाडी , बुध , कुमठे , वडगाव , पुनवडी , कातरखटाव , गोरेगाव ( निमसोड ) , मुळीकवाड़ी , कान्हरवाडी , होळीचागाव , येळीव , भांडेवाडी , कानकात्रे , म्हासुर्णे , सातेवाडी , बनपूरी , खरशिंगे , कातळगेवाडी , काटेवाडी व लांडेवाडी .
अनुसूचित जाती महिला – भूषणगड, कोकराळे , त्रिमली , धारपुडी , तडवळे व निमसोड
अनुसूचित जाती खुला – पुढील प्रमाणे – कणसेवाडी , गारवडी , सुर्याचीवाडी , वर्धनगड ,दरजाई व शेनवडी .
नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला पुढील प्रमाणे – अनफळे , गोपूज , विखळे , कुरोली , चोराडे , अंभेरी , लोणी , गणेशवाडी , जायगाव , दहिवड , मोराळे , रणसिंगवाडी , खातवळ , एनकूळ , नेर , तरसवाडी , चितळी व वरुड .
नागरीकांचा मागासवर्ग खुला पुढील प्रमाणे – कलेढोण , पळसगाव , पोपळकरवाडी , रेवली , निढळ , वडी , अंबवडे , मांडवे , राजापूर , कारंडेवाडी , राजाचेकुर्ले , उंचीठाणे , हिंगणे , डिस्कळ , शिंदेवाडी , विसापूर व लाडेगाव .







