शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विकासकामांचा झंझावात सुरु असून नुकताच त्यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मौजे करंजी येथील जागृत देवस्थान श्री विरभद्र महाराज मंदिरासमोरील सभामंडप भूमिपूजन सोहळा युवा नेते रोहित भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवण तर प्रमुख उपस्थितीत शिवसेना ग्राहक कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर उपस्थित होते.
सर्वप्रथम गुरूंच्या मंत्रोच्चारात रोहित दादांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून आणि जेष्ठ ग्रामस्थांनी श्रीफळ वाढवून रुपये 7 लक्ष कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यानंतर युवासेनेचे चंदू नाना भिंगारे आणि सरपंच रविंद्र आगवन यांनी मनोगत व्यक्त करत माजी खासदाराने या कामासाठी शब्द दिले पण पाळले नाहीत म्हणून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले मात्र विद्यमान खासदार महोदयानी निवडून येताच पहिल्याच टप्प्यात दिलेला शब्द पाळल्यानेसमाधान व्यक्त करत आभार मानले. यानंतर मुकुंद सिनगर यांनी आपल्या भाषणात माननीय खासदार साहेबांची कोपरगाव तालुका विकासाबाबतची दूरदृष्टी आणि व्हिजन ग्रामस्थांपुढे ठामपणे मांडले असता टाळ्या वाजवून सर्वांनी दाद दिली. शेवटी रोहित दादा वाकचौरे यांनी करंजी ग्रामस्थांनी आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी केलेल्या सुंदर नियोजनाचे कौतुक करत आभार मानले आणि यापुढेही या गावासाठी खासदार साहेबांकडून जे जे शक्य आहे ते ते मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र जी आगवण, माजी उपसभापती नवनाथ जी आगवण,जेष्ठ नेते लक्ष्मण जी भिंगारे, शिवसेना UBT चे उपतालुकाप्रमुख कृष्णा जी आहिरे, युवासेना उपतालुकाप्रमुख चंदू नाना जी भिंगारे माननीय खासदार साहेबांचे स्वीय सहाय्य्क शंकर जी सिनगर यांच्यासह विरभद्र यात्रा कमिटी व प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक वर्षापासून शब्द दिला जातो मात्र सभामंडप होत नाही या ग्रामस्थांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुकुंद सिनगर यांनी सन 2024-25 या वर्षातील निवडून आल्यानंतरचा माननीय खासदार महोदयांचा सहा महिन्याचा फक्त कोपरगाव तालुक्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडला. माजी खासदार साहेबांनी जरी आपल्याला फसवलं असलं तरी आम्ही मात्र दिलेला शब्द पाळतो आणि कुणावरही टीका न करता आमच्या विद्यमान खासदार साहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे फक्त जनतेच्या विकासकामांवर लक्ष देतो, त्यामुळे यापुढे तरी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असा सल्ला दिला. आमच्याकडे श्रेय घेण्यापेक्षा काम करण्यावर भर दिला जातो, याचीही आठवण करून दिली. माननीय खासदार साहेबांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील एकूण 17 गावे मिळून 72 लक्ष रुपये, केंद्र सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 5 गावे मिळून 50 लक्ष रुपये आणि जिल्हा विकास निधी अंतर्गत 7 गावे मिळून 42 लक्ष रुपये निधी मंजूर करून दिल्याबद्दल लोकनेते खासदार भाऊसाहेब जी वाकचौरे यांचे समस्त कोपरगावकरांच्या वतीने शेवटी मुकुंद सिनगर यांनी जाहीर आभार व्यक्त केले आणि यापुढेही माननीय खासदार महोद्याच्या मदतीने दिलेल्या शब्दाप्रमाणे विकासाची घोडदौड अशीच सुरु राहणार असल्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन देविदास भिंगारे यांनी तर आभार कृष्णा आहिरे यांनी मानले.







