विठेवाडी शिवारात आहेर वस्ती मयत बिबट्या आढळला, वनविभागाने पंचनामा करुन केलं दहन

मयत बिबट्या

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने विठेवाडी भउर शिवारात, लहान ,मोठे बिबटे आढळून येत आहेत, सद्या उस आणि मका तसेच अवैध जंगल तोड मुळे जंगली प्राणी पाणी आणि भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढला आहे.

 

सध्या अतिशय कडक उन्हाळा असल्याने जंगलात पाणी भक्ष मिळत नसल्याने जंगली प्राण्यांनी मानवी वस्ती कडे धाव घेतली आहे, बेसुमार जंगलतोड मुळे त्यांना आश्रयासाठी मानवी वस्ती कडे धाव घ्यायची वेळ आली आहे.
– कुबेर जाधव,
चेअरमन विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था

आज दुपारी विठेवाडी शिवारातील आहेर वस्ती जवळील विलास निकम यांच्या बंगल्या समोरील मोकळ्या शेतात मयत बिबट्या आढळून आला असता स्थानिक शेतकरी व गांव पोलिस पाटील बापु निकम यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधुन त्यांना पाचारण केले, वनविभागाने जागेवर पंचणाणा करुन मतत बिबट्याचे शेव ताब्यात घेऊन, तात्काळ पोस्टमार्टेम करण्यात येवून देवळा येथील वनविभागाच्या कार्यालया शेजारी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दफन करण्यात आले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जाधव, यावेळी धनपाल श्री पी,एस, पाटील, वनरक्षक विजय पगार, नामदेव ठाकरे,सूवर्ना डुकडे, देविदास आहेर,दिपक पवार,राजु भदाने आदी उपस्थित होते, बिबट्या कशामुळे मयत झाला याचं कारण समजू शकले नाही,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here