सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : धाराशिव कारखान्याचा चेअरमन बोलत आहे. असे सांगून कारखान्यातील एका कर्मचाऱ्यास 1 कोटी 10 लाख रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले त्यानंतर काही वेळाने कारखान्याची फसवणूक झाली हे लक्षात येतात ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे
यातील तीन आरोपी पंढरपूर तालुक्यातील आहेत. धाराशिव कारखान्याचे चेअरमन बोलत आहेत असे सांगून कारखान्यातील कर्मचाऱ्यास ऑनलाईन 1 कोटी 10 लाख रुपये पाठवण्यास सांगितले त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांना दिले त्यांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती आमदार अभिजीत पाटील यांना कळवली आमदार पाटील यांनी लगेच धाराशिव पोलीस ठाण्याची संपर्क साधून कारखान्याची 1 कोटी 10 लाख रुपये ची असल्याची सांगितले.
पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणातील सहा आरोपींना अटक केली यातील तीन आरोपी पंढरपूर तालुक्यातील आहेत. यामध्ये सागर संत करकम येथील सतीश देशमुख व आणखी एकाचा समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ तपासण्याचे चक्रे फिरवून सहा आरोपींना अटक केली यामुळे पुढील अनर्थ टाळला आहे. या आरोपीकडून फसवणूक झालेली 1 कोटी 10 लाख रुपयाची रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.







