परभणी (प्रतिनिधी) : शहरातील प्रसिद्ध पोहे वाले परमेश्वर कदम यांनी काल 27 एप्रिल वसमत रोड वरील स्वतःच्या हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास गळफास घेतला त्यात त्यांचा मृत्यू झाला गळफास घेण्यामागचे कारण अस्पष्ट आहे.
परभणी शहरातील वसमत वसमत रोडवर संजीवनी पोहे सेंटर या नावाने सुप्रसिद्ध पोहे प्रसिद्ध हॉटेल आहे. परमेश्वर कदम ( वय 60 वर्ष रा. आचार्य नगर ) हे हॉटेलचे मालक सर्वांच्या ओळखीचे होते रविवारी 27 एप्रिल दुपारच्या सुमारास परमेश्वर कदम यांनी आपल्या संजीवनी पोहा सेंटर येथे गळफास घेतला घटनेची माहिती समजताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आली मात्र त्यांचा मृत्यू झाला होता
त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे नेमका गळफास का घेतला याचे कारण मात्र नाही समजले नागरिकांमध्ये अशी चर्चा होती की ती काही दिवसापासून अस्थिर होते.







