जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध : आझाद खा युनूस खा पठाण

आझाद खा युनूस खा पठाण

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २८ निरपराध भारतीय नागरिकांचे दुःखद निधन झाले आहे. या अमानुष घटनेचा आज (दि.२८) युवा जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी, आझाद खा युनूस खा पठाण यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

आझाद खा पठाण यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. भारतमातेच्या शहीद सुपुत्रांना समाजवादी पार्टीच्या वतीने ह्रदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच, शहीदांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत व ईश्वर त्यांना या दुःखाचा सामना करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.
त्यांनी गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे मागणी केली आहे की, या भ्याड हल्ल्यामागील दोषींना तात्काळ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशातील सुरक्षा व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याव्यात. “दहशतवादाचा नाश होवो, शहीद अमर राहो!” असा जोरदार नारा देत त्यांनी सर्व देशवासीयांना एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here