सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : महाराष्ट्रात गावोगावी जत्रा यात्रा कुस्त्या ओव्या तमाशा लावण्या भारुड गाणी यांसह दैनंदिन जगणं असो किंवा पुस्तकातल्या ओव्या याच साहित्यांना आपल्याला खूप काही दिलं आहे. आज पंढरपुरात महाराष्ट्र साहित्य परिषदच्या शाखा पंढरपूर यांच्या वतीने साहित्य शाखा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये पुढील १०१ वे साहित्य संमेलन पंढरपुरात होण्याची इच्छा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. वारकऱ्यांचे साहित्याशी दृढ नाते असून त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार समाधान आवताडे ज्येष्ठ साहित्य डॉ. द.ता. भोसले पुणे शाखाप्रमुख डॉ. प्रा. मिलिंद जोशी सर साहित्य सौ. सुनिता राजे भोसले कार्यवाह विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर, डॉ. मनोज भायगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्य उपस्थित होते.







