बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी शिस्तबद्ध कार्यपद्धतीला प्राधान्य देत कर्तव्यात कसूर करणाऱ्या २१ पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे बुलडाणा, शेगाव, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, मलकापुर, सिंदखेडराजा आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यांतील संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित आहे. ही कारवाई पारदर्शकतेसह पोलीस प्रशासनातील शिस्त व कार्यक्षमता यावर भर देणारी आहे.
पोलीस अधीक्षक पानसरे यांची भूमिका प्रशंसनीय ठरली असून, “कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना माफी नाही” असा स्पष्ट संदेश त्यांनी सर्व पोलीस दलाला दिला आहे.







