अहिल्यानगर (अहमदनगर) (जिल्हा क्राईम रिपोर्टर आण्णासाहेब बनसोडे) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. याबाबत नुकतेच राज्य शासनाच्या गृहविभागाने आदेश काढले आहेत. त्यांच्या जागी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगरचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले
सोमनाथ घार्गे यांनी श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण केला होता. यानंतर सोमनाथ घार्गे यांनी मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच, त्यांनी रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले lआहे.







