नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली ट्रान्सपोर्ट क्षेत्रासाठी नव्या पर्वाचा आरंभ

सुनील पाटील

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेल्या नवभारतीय शिववाहतूक संघटनेने कुर्ला ऑफिसमध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून संघटनेने नव्या कार्यपद्धतीची घोषणा केली. यामध्ये भाजपाचे ट्रान्सपोर्ट संघटनाचे प्रमुख हाजी अरफान शेख हे उपस्थित होते. त्यांनी भाजपाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष या नात्याने संघटनेच्या पुढाकाराचे कौतुक करत ट्रान्सपोर्ट क्षेत्रात पारदर्शकता आणण्यावर भर दिला.

 

नंदूअप्पा पाटीलया बैठकीत खास करून पुणे व जळगावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत़े. या बैठकीत सागर बोरसे (भोसरी, पुणे) आणि किशोर पाटील उर्फ (नंदू आप्पा) तसेच यांनी संघटनेच्या कार्यक्षमतेसंबंधी आपले विचार मांडले. या बैठकीत विशेष उपस्थितीत ओबेद खान (कुर्ला) यांचा देखील सहभाग होता. ट्रान्सपोर्ट चालक आणि मालक यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ म्हणून नवभारतीय शिववाहतूक संघटना कार्यरत आहे
बैठकीत ट्रान्सपोर्ट संबंधित समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना सूचविण्यात आल्या. यामध्ये रोड टॅक्स, टोल वसुली, मालवाहतुकीतील अडथळे आणि पोलिसांच्या कारवाईतील पारदर्शकतेवर भर देण्यात आला. संघटनेच्या पुढील धोरणात्मक पावलां मध्ये एकात्मिक सहकार्य, स्थानिक प्रशासनासोबत समन्वय आणि चालक-मालक यांच्यातील संवाद यावर भर राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
संघटनेचा उद्देश फक्त आंदोलन करणे नसून, विधायक भूमिका बजावून ट्रान्सपोर्ट व्यवसायात शिस्त, सुरक्षा आणि नवनिर्मिती घडवणे असल्याचे मत हाजी अरफान शेख यांनी मांडले. या बैठकीने ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील नव्या युगाची सुरुवात झाली असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.या बैठकीत केतन पाटील पुणे चेतन महाले तसेच बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील व विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here