शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईबाबांच्या परम भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या ६२ व्या पुण्यतिथीनिमित्त शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मधील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप व तसेच शिर्डी परिसरातील अपंग व्यक्तींना सायकल वाटप करण्यात आले.
ट्रस्ट चे अध्यक्ष अरुणराव शिंदे- गायकवाड पा.यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी ट्रस्ट च्या विश्वस्त सौ. संगीता गायकवाड पा. साई9 ग्रुप चे संचालक श्री. साईराज अरुणराव गायकवाड पा. व सहपरिवार पालक विद्यार्थी श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयातील जेष्ठ अध्यापक श्री एन पी जाधव सर व श्री ढाकणे सर हे उपस्थित होते.गरजू गुणवंत विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ट्रस्ट च्या वतीने वेळोवेळी शालेय साहित्य वाटप करून मदत करण्यात येते व आता दूरवरून येणाऱ्या विद्यार्थी/ विद्यार्थिनीं ची जाण्या येण्याची गैरसोय होऊ नये म्हणून २ जून २०२५ रोजी सायकल वाटप करण्यात आले.
ट्रस्ट चे हे कार्य अविरतपणे असेच सुरू राहणार आहे असे ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड यांनी बोलताना सांगितले. विद्यालयातील या गरजू विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे को चेअरमन श्री मनोज भाऊ लोढा व सर्व शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापक श्री डुबल सर उपमुख्याध्यापिका सौ बोऱ्हाडे मॅडम पर्यवेक्षक श्री मोटे सर यांनी विद्यालयाच्या वतीने साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट यांचे आभार व्यक्त केले. श्री साईबाबांची आरती करून व अन्नदान वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.







