सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर राहुल मस्के) : सोलापूर जिल्हा परिषद शाळा विविध विभागाचे 177 कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्ती झाले. त्यामुळे आता पुन्हा नव्याने 200 ते 300 कर्मचारी विविध विभागासाठी नव्याने भरती करावे लागणार आहेत.
शासकीय नियमानुसार 21 मे रोजी जिल्हा परिषदेचे 177 सरकारी कर्मचारी शनिवार 31 मे रोजी सेवा निवृत्ती झाले. त्यामुळे जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या आहेत. शासकीय सेवेत एक जून जन्मदिनांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे 31 मे रोजी निवृत्तीचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत,कृषी, अर्थ, ग्रामीण पाणीपुरवठा आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम व शिक्षण या विभागातील 177 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. शिक्षण विभाग 97, ग्रामपंचायत 18, आरोग्य विभाग 15, पशुसंवर्धन चार, बांधकाम क्रमांक एक 10, बांधकाम क्रमांक दोन आठ, सामान्य प्रशासन विभाग 11, ग्रामीण पाणीपुरवठा दोन, कृषी दोन, आणि अर्थ विभाग 10 अशा एकूण 177 कर्मचाऱ्यांच्या निवृत्त झाले आहेत.







