मुंबई (संपादक सुनिल पाटील) : गुरुवार दिनांक दिनांक 05/06/2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 12.00 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान, आदी शंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम करिता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या हजर होते. तसेच सपोआ प्रदीप मैराळे साकीनाका विभाग, वपोनि जितेंद्र सोनवणे, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, पोलिस निरीक्षक जयदीप गोसावी व इतर अधिकारी व अंमलदार हजर होते.







