श्री जोतिबा डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून ‘दख्खन केदारण्य’ निर्मितीचा शुभारंभ

दख्खन केदारण्य

कोल्हापूर (प्रतिनिधी अनिल सांगळे) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जोतिबा डोंगर येथे, तोरणाई कडा या ठिकाणी श्री क्षेत्र जोतिबा डोंगर संवर्धनासाठी वृक्षारोपण करून ‘ दख्खन केदारण्य’ निर्मिती आणि श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरण शुभारंभ शुभ हस्ते,( व्ही. सी. द्वारे) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनज गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

आमदार विनयरावजी कोरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत तोरणाई कडा या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी आमदार विनयरावजी कोरे यांनी सांगितले की श्री केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेख असणाऱ्या औषधीय व भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे मोठया प्रमाणात जोतिबा डोंगर परिसरात वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले ,
या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी वनविभाग,व श्री ज्योतिर्लिंग हायस्कूल वाडी रत्नागिरी,या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले, या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here