श्री लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

नेत्र तपासणी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने दिनांक 2 जून 2025 रोजी चौदावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.

यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री.डॉ श्री विजय ब्राह्मणे व डॉ. एस एम सौम्यश्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.2 जून रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 940 रुग्णांची मोफत तपासणी होऊन रूग्णांना मोफत चष्मा वाटप केले व 49 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पनवेल येथे नेण्यात आले.
शिर्डी शहर व परिसर तसेच बुलढाणा, जालना, ठाणे,कल्याण, मालेगाव, अहिल्यानगर ,येवला, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी नाशिक,राहाता, कोपरगाव, धुळे आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 11940 पेक्षा जास्त गरजू व वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत 1150 पेशंट ची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच भारतात नावारूपास आले असून ट्रस्ट च्या वतीने अशा प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील. पुढील १५ व्या मोफत शिबीराचा लाभ देशातील अनेक गरजूंनी घ्यावा असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील यांनी केले. ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here