पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’ नुसार वृक्षसंवर्धनाच्या उपाययोजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने “वृक्षारोपण सप्ताह २०२५” आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ०५ जून २०२५ रोजी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान येथे करण्यात आली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता ३२ वृक्षांचे रोपण करून अभियानाची औपचारिक सुरुवात झाली.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सल, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, शैलेश मोरे, सुनिल कदम, विजय घोडके, श्रीकृष्ण काशीद, महाराष्ट्र राज्य मर्दानी खेळ असोसिएशनचे संजय बनसोडे, श्रेयस चव्हाण, शिवदत्त सिंघ, शिवम बाबर, पिंपरी संभाजीनगर रोटरी क्लबचे संतोष गिरांजे, सेवा सारथी फाऊंडेशन संभाजीनगरचे ओंकार मांडगे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







