पुण्यात मुसळधार; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचे संकेत

मुसळधार

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : राज्यात मान्सूनचा जोर वाढत असून पुणे शहर आणि उपनगरांत शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी झालेल्या पावसानंतर आता पावसाने आणखी जोर धरला असून अनेक भागांत पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

लांडेवाडी, भोसरी एमआयडीसी, शांतीनगर या भागांतही जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले. ज्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे शहरात शनिवारी ५०-७० मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.
लोहेगाव, लवळे, एनडीए गेट, कोरेगाव पार्क या भागांसह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पावसाचा जोर अधिक जाणवला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिंपरी, चिंचवड आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरात प्रचंड पाऊस कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
राज्यात गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र गेल्या एक ते दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे. दरम्यान मुंबईला पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here