कॉँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली

सोनिया गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॉँग्रेस नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना सिमल्यातील IGMC हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुट्टी साजरी करण्यासाठी सोनिया गांधी या सिमल्यात आल्या होत्या.

आज दुपारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना सिमल्यातील आयजीएमसी म्हणजेच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
कॉँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या सिमल्यात आल्या होत्या. मुलगी प्रियंका गांधी यांच्या सिमल्यापासून जवळच असणाऱ्या घरी थांबल्या होत्या. मात्र शनिवारी दुपारी त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here