भारतीय मच्छुवारा समाज संघटनेच्या शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी पत्रकार जीवन भोई यांची निवड

दोंडाईचा (संतोष कोळी) – भारतीय मच्छुवारा समाज संघटनेच्या शिंदखेडा तालुका अध्यक्षपदावर जीवन लक्ष्मण भोई यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्ष मा.शंकररावजी वानखेडे व धुळे जिल्हाध्यक्ष सुवालाल ढोले यांच्याकडून जीवन भोई यांना त्या स्वरूपाचे नियुक्ती पत्र नुकतेच देण्यात आले आहे.

दोंडाईचा येथील मानाचे दादा गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य व सल्लागार असून सध्या ते अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघ दोंडाईचा शाखेचे सचिव व सल्लागार, भोईराज शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक युवा मंच,दोंडाईचाचे संस्थापक अध्यक्ष, खान्देश मराठी पत्रकार संघाचे सदस्य व उपाध्यक्ष, श्री राजा गणपती मंडळाचे संस्थापक व प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांचा सुसंस्कृत, मधुर, मनमिळाऊ स्वभाव,सामाजिक कार्याची जाण व त्यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य व कार्यानुभाच्या आधारे त्यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष शंकररावजी वानखेडे व जिल्हाध्यक्ष सुवालाल ढोले यांनी शिंदखेडा तालुक्याची जबाबदारी सोपविली आहे. त्या अनुषंगाने जीवन भोई हे सहकाऱ्यांसह संघटनेच्या माद्यमातून शिंदखेडा तालुक्यातील गावागावात असणाऱ्या भोई समाज बांधवांपर्यंत संघटनेचे कार्य व उद्देश पोहचविणार आहेत. त्यांच्या या निवडबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकररावजी वानखेडे, जिल्हाध्यक्ष सुवालाल ढोले तसेच, युवराज मोरे, विनोद मोरे,पावबा रामोळे, प्रा.संतोष तमखाने, प्रा.प्रविण वाडीले, दिपक ढोले, आर.सी.रामोळेसाहेब, डॉ. भुषण वाडीले, प्रविण गिरधर वाडीले, साहेबराव मोरे, संदीप रामोळे, मंगेश मोरे, महेंद्र रामोळे, कमलेश रामोळे, प्रविण रामोळे, रामचंद्र रामोळे, निलेश वाडीले,स्वप्निल निकवाडे, सुरेंद्र रामोळे आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here