चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्षपदी विजय पवार यांची निवड

चर्मकार

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : येथील जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये राज्य अध्यक्ष संजय खामकर (अहिल्या नगर)यांनी शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी राज्य सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, संजय भटकर, काशिनाथ इंगळे, वसंत नेटके, जिल्हा अध्यक्ष अर्जुन भारुळे, सचिव धनराज भारुळे, राजेश वाडेकर, कैलास वाघ,खंडू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.विजय पवार यांनी विद्यार्थी गुणवंत सत्कार, वधू -वर परिचय मेळावा, समाज भवन निर्माण, सामाजिक जनजागृती यासोबतच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here