नांदुरा पोलिसांचा नारखेड शेत शिवारातील मोहा दारूभट्टीवर छापा

दारूभट्टी

बुलडाणा (जिल्हा क्राईम रिपोर्टर सचिन जगदाळे) : रविवारी (दि.८) मिळालेल्या गुप्त खबरीवरून नारखेड तालुका नांदुरा शिवारातील ई क्लासचे जागेतील नाला भागामध्ये आरोपी नामे संतोष भोनाजी डाबेराव (वय ४२ वर्ष राहणार नारखेड तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा) याचेविरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

यावेळी त्याच्या ताब्यातून दोन २० लिटर क्षमतेच्या टिन पत्राच्या डब्यामध्ये ४० लिटर गुळ मिश्रित सडवा ४ हजार रुपये, . एका पंधरा लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅन मध्ये १२ लिटर हातभट्टीची दारू किमत १२०० रुपये, टीन पत्राच्या डब्यामध्ये तीस लिटर मोह सडवा ३००० रुपये व इतर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे साहित्य किमत ३०० रुपये असा एकूण ८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क)(फ)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहे का गजानन इंगळे, पोहे का संजय वराडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here